
ग्रामपंचायत कार्यालय पळसगाव व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळसगाव बाई यांचा संयुक्त उपक्रम*
- श्री. धीरज लेंडे

- Oct 15
- 1 min read
दिनांक: 🗓️
ठिकाण: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पळसगाव बाई
ग्रामपंचायत कार्यालय पळसगाव तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळसगाव बाई यांच्या संयुक्त विद्यमाने “हात धुणे दिवस” उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुनीता लेंडे, श्री. राऊत सर, श्री. सुरकार सर, अंगणवाडी सेविका सौ दुर्गाताई लेंडे, रंजना भट, व मदतनीस, सौ. वैशाली गोल्हर, प्रशांत बुरले व महेंद्र भट यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना हात धुण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. हात न धुतल्यामुळे होणाऱ्या विविध आजारांबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. आरोग्य राखण्यासाठी स्वच्छतेचे महत्त्व आणि नियमित हात धुण्याची सवय याबद्दल प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वच्छतेचा धडा प्रत्यक्ष जीवनात अंगीकारण्याचा संकल्प केला.
या उपक्रमाद्वारे स्वच्छ, निरोगी आणि आरोग्यदायी समाजाच्या निर्मितीकडे एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. 🙌
“स्वच्छतेचा संकल्प – निरोगी भारताची वाटचाल”).




Comments