top of page

पळसगाव येथे पाणलोट अंतर्गत एफपीसी प्रशिक्षण शिबिराचे यशस्वी आयोजन*

ग्रामीण महिलांचा उद्योगाकडे निर्धार — बचत गटांना नवसंजीवनी


(वार्ताहर) — पाणलोट योजनेअंतर्गत पळसगाव येथे सॉईल सन ॲग्रोटेक फार्मर प्रोड्युसर कंपनी एफ पी सी सदस्य व ग्रामस्थांसाठी दोन दिवसीय फार्मर प्रोड्यूसर कंपनी (FPC) प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ग्रामीण भागात लघुउद्योग आणि शेतीपूरक व्यवसायाद्वारे आर्थिक विकास कसा साधता येईल, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.


कार्यक्रमाचे उद्घाटन पाणलोट समितीच्या अध्यक्षा सौ. वैशाली किशोर गोल्हर यांच्या हस्ते झाले. यावेळी सचिव श्रीकांत बुरले, एफपीसी संचालक सौ. प्रीती धीरज लेंडे, सौ. पूजा किरण रेवतकर, सौ. हेमेश्वरी महेंद्र भट आदी मान्यवर उपस्थित होते. प्रशिक्षणार्थी म्हणून श्री नागतोडे सर व आकांक्षा खंडाळे मॅडम यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता प्रशांत बुरले महेंद्र भट रुपेश मून त्याचप्रमाणे माजी सरपंच धीरज लेंडे यांनी यशस्वीपणे नियोजन केले


शिबिरात ग्रामीण महिला व पुरुषांना स्वयंरोजगार, उद्योगिकता आणि एफपीसीच्या माध्यमातून सामूहिक प्रगतीचे महत्त्व पटवून देण्यात आले. दुपारी भोजनावकाशानंतर सत्र पुन्हा सुरू झाले व सायंकाळी पाच वाजता समारोप झाला.


प्रशिक्षणानंतर महिलांनी नव्या जोमाने बचत गटांच्या माध्यमातून उद्योग उभारणीचा संकल्प केला. या उपक्रमामुळे पळसगाव परिसरात ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण आणि उद्योगसंवर्धनाचा नवा अध्याय सुरू झाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram

कार्यालय  ग्रामपंचायत पळसगांव (बाई), पं.स. सेलू, जि.प. वर्धा  पिन 442105

   |  gppalasgaon.bai49@gmail.com  |  Tel: +91 7387755368

​कार्यालय वेळ : सोम. ते शुक्र. सकाळी १० ते सायंकाळी ६ 

©2021 by GP PALASGAON (BAI). Created By Swapnil Vairagade, Mob. +91 8208627393

bottom of page